एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक त्रोटक ओळख

एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक त्रोटक ओळख 

साधारण पणे एखाद्या कंपनीमध्ये वेगवेगळे विभाग कार्यरत असतात. प्रत्येक विभागाची एक कार्य पद्धती असते. पण हे विभाग कोणत्याही व्यवसायात असले तरी साधारण पणे एकच काम करत असतात. म्हणजे विक्री विभाग ग्राहक मिळवणे व ग्राहकाची मागणी उत्पादन विभागाकडे देणे. हे काम सगळीकडेच सारखे आहे. कदाचित त्याचे स्वरूप काहीसे बदलत असेल पण काम तेच उरते. पुढे उत्पादन विभागाने उत्पादन गोदामात आहे का ते तपासणे नसल्यास खरेदीविभागाला कळवणे. उत्पादन गोदामात असल्यास वाहतूक विभागाला कळवून शिपींग वगैरे ची व्यवस्था करायला सांगणे.

 

ऐंशी च्या दशकात प्रत्येक विभाग आपले काम चालवण्यासाठी आपली स्वतःचे प्रणाली वापरत होता. या प्रणाल्या त्या त्या कामांसाठी बनवलेल्या होत्या. त्यांना ते काम कंपनीच्या व्यवसाय पद्धतीप्रमाणे करण्यासाठी विकसीत केले गेले होते. याचे काही चांगले भाग होते की, व्यवसायाच्या त्या विभागाला लागणारे योग्य ते स्वातंत्र्य त्या त्या विभागाला होते. पण त्याच बरोबर हे विभाग एखाद्या बेटासारखे होते.
म्हणजे जर लेखा विभागाला विक्री विभागाची माहिती हवी असेल तर मिळायची – ती गरजच आहे. पण त्यांना तंत्रज्ञान विभागाची माहिती मिळण्याची सोय नव्हती. थोडक्यात दोन प्रणाल्या एकमेकांशी पुर्णपणे संवाद साधू शकत नव्हत्या. याचा व्यवसायाच्या संपूर्ण कार्यावर परिणाम होत होता.

यावर उपाय म्हणून व्यवसायाचे सर्व विभाग एकमेकांशी जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. यामध्ये व्यवसायाचा मुख्य गाभा असलेली माहिती एका ठिकाणी ठेवायची आणि इतर ती माहिती खणून पाठवण्याची यंत्रणा वेगळी ठेवायची अशी कल्पना उदयाला आली.

 

या पद्धतीमध्येही काही दोष होतेच. एकूण एकावेळी किती लोक मुख्य गाभ्या ला जाणार याला मर्यादा होती. मग पुढची पायरी म्हणजे तीन स्तरीय व्यवस्था. यात गाभा वेगळा ठेवायचा, गाभा पाठवायला म्हणून एक स्वतंत्र यंत्रणा द्यायची आणि वापरकर्ते वेगळे करायचे असे झाले. यामुळे जास्त लोकांना मुख्य माहितीसाठ्या पर्यंत जाण्याची सोय झाली. पण अर्थात प्रत्येक वापरकर्त्याची किंमतही वाढतीच होती आणि आहे. सगळे विभाग एकमेकांशी बोलतील अशी प्रणाली विकसीत झाली.

परंतु काही व्यवसायांना सगळ्या प्रणालीची गरजही भासत नव्हती. मग गरजे प्रमाणे हवे ते विभाग बनवले गेले. हे विभाग सहजतेने जोडता येतील (प्लग अँड प्ले) अशी व्यवस्था केली गेली.

आता एक प्रणाली तयार झाली. पण आधीच्या वेगवेगळ्या विभागाच्या माहितीसाठ्यांना व प्रणाल्यांना (ओरॅकल, आय बी एम वगैरे) सामावणे महत्त्वाचे होते. ते करण्यासाठी या प्रणालीला बोलते केले गेले. म्हणजे टिसिपीआयपी व जावा या द्वारे इतर प्रणाल्या बोलता येणे शक्य झाले. याचा फायदा असा झाला की महाजाल वापरून व्यवसायाचे काम जागतिक स्तरावर करणे सुलभ झाले.

या विषयावर काम करण्यासाठी जर्मनीमध्ये साधारणपणे ८०च्या दशकात आय बी एम मधले काही संगणक तज्ञ एकत्र आले व त्यांनी व्यवसायाला एकत्र बांधण्यासाठी एक प्रणाली विकसित करायला सुरुवात केली. हे काम करण्यासाठी त्यांना सोपी भाषा मिळेना तेव्हा त्यांनी आपलीच भाषा लिहून काढली. ए.बी. ए. पी. नावाची. सद्या या भाषेची चौथी पिढी वापरली जाते आहे. ही भाषा वापरून त्यांनी लिहिली सॅप प्रणाली लिहिली.

-निनाद कट्यारे

Advertisements

टॅग्स: , , , , , ,

14 प्रतिसाद to “एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक त्रोटक ओळख”

 1. sandip Says:

  chhan

 2. rohan Says:

  chan
  mala ek shanka aahe?ki me mechanical eng aahe tar sap cha mala careear mhanun fayda hoil ka?
  pls mala madat kara…..
  rrohan.upasani@gmail.com

  • katyare Says:

   रोहन,

   सॅप ही एक बिझिनेस सिस्टिम आहे. आणि आज अश्या अनेक सिस्टीम्स जगात तयार आहेत. जसे पिपलसॉफ्ट, जे डी एडवर्डस्, सेज इत्यादी.

   त्यामुळे फक्त सॅप शिकायचे की बिझिनेस सिस्टीम्सना लागणारे लॉजिक कसे चालते, हे शिकायचे हा तुमचा आणि समोर असलेल्या परिस्थिती नुसार घ्यायचा निर्णय आहे असे वाटते.

   सॅपचा उपयोग करीयर मध्ये व्हायला काहीच हरकत नाही. पण तो कसा करून घ्यायचा हे मात्र पाहिले पाहिजे. खरे सांगायचे तर, नक्की कसे उत्तर अपेक्षित आहे तेच कळले नाहीये मला. तुम्हाला सॅप विषयक कोर्स करण्याची इच्छा आहे का? तसे असेल तर मुंबई मध्ये बहुदा एल अँड टी असे कोर्सेस घेते. अन्यथा तुम्ही ज्या कंपनीत जॉब करत असाल तेथेच काही अनुभव हाताशी येईल असे पाहा. हा सगळ्यात स्वस्त मार्ग! याच वेळी काही प्रमाणात एसक्युएल शिकणे ही मदतीचे ठरावे.

   माझ्या मते कोणत्याही इंजिनियरला एआरपी सिस्टिम्स माहिती असल्याच पाहिजेत. पण अर्थात हे तो कोणत्या क्षेत्रात काम करतो आहे त्यावर अवलंबून आहे.

   आशा आहे की याची मदत होईल.

   आपला
   निनाद

 3. Sarang Says:

  hello,
  me just PGDM complete kele aahe Marketing madhe. aani eka lahan software companyt business development executive manhun kaam karit aahe. mala SAP cha upyog kadhi aani kevha karun gheta yeil. Mala SAp course karnysaathi Kiti varshycha experience lagel

 4. Chandrakant Says:

  I am very glad to read this artical

 5. ashok Says:

  chhan.

  fico module cha exam q. paper theari asel ka objective
  reply fast plzzzzzzzzz………

 6. Dattatraya Says:

  Very nice article.
  Thanks

 7. mandar Says:

  mi ICWA karat aahe sadhya. mi eka compani madhye costing department madhye kam karat aahe.as a tranee . mala sap shikaych aahe. mala SAP shiklyawar tyacha mazya field madhye kasa use hoil ?
  future madhye changla job milvanyasathi kasa use hoil?
  plz help me………..

  • katyare Says:

   ICWA करत असतांना नोकरी आणि अजून एक SAP चा कोर्स हे मला जास्त वाटते आहे. ICWA पूर्ण करून मग SAP चा कोर्स करता येईलच. SAP FI CO (फायनांस अँड कंट्रोल) मोड्युल केले तरी तुमचे काम चालण्यासारखे आहे. या शिवाय तुमच्या कंपनीमध्येच SAP चा अनुभव मिळत असेल तर अजून चांगले! इ आर पी सिस्टीम्स माहिती असल्या तर फायदा होईल. चांगल्या ठिकाणाहून कोर्स आणि ICWA या बळावर अ‍ॅक्सेंच्युअर किंवा डिलॉइट सारख्या कंसल्टींग कंपन्यांमध्ये काम मिळू शकेल. शिवाय काही सॉफ्टवेयर कंपन्यापण चालू शकतील. पण तुम्हाला बिझनेस अ‍ॅनेलिस्ट सारख्या विभागात जाण्याची इच्छा असेल तर… पण ICWA पूर्ण कराच!

   आशा आहे याचा उपयोग होईल.

 8. abhijeet Says:

  me banket ass br manager mhanun kam karit ahe tari mala SAP cha kasa ani kothe kothe upyog hou shakato, krupaua kalawawe

 9. prakash sopan gaikwad Says:

  ninad sir,

  SAP cha course kontya institue madhun karu. ani tyacha future madhe mi kashya prakare utilies karun gheu. mi mumbai madhe rahato.

  prakash gaikwad

 10. ki Says:

  Im CA INTER Student , if i do SAP Course it will be better for geting job?????????????

 11. Nandkishor Says:

  nice article mr. mandar,hope it is very informative for most of people

 12. Akshay Mane Says:

  Ninad Sir,
  Mi Sodexo food solution India PVT LTD(HOSPITALITY) madhey Store-EXECUTIVE aahe tithe FSpro navach software karyarat aahe. tr mi SAP cha course kela tr mla kasha prakare faydeshir padel career chya drushtine…
  pls margdarshan kara………..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s


%d bloggers like this: